Thursday, 16 August 2012

Group of Monkeys in Indian Traffic


Its kind of incident which can happen only in India. Group of Monkeys in Indian Traffic without making any menace. This incident took place in Vadodra, Gujarat.

Dog Thinking


जरा पहा, प्राणिमात्र आपली किती काळजी करत आहेत, आणि तुम्ही ..........

Wednesday, 15 August 2012

Narayan Surve's Last Poetry Recitation


दिनांक- १३ जुलै २०१०

स्थळ- रवीन्द्र नाटयमंदिराच्या पु. ल. देशपांडे अकादमीचे मिनी थिएटर

कार्यक्रम- 'त्रिवर्षा' डिम्पल प्रकाशनतर्फे ३ पुस्तकांचे प्रकाशन. यात नारायण सुर्वेलिखित 'कहाणी कवितेची' या पुस्तकाचे प्रकाशन. या प्रसंगी कवी नारायण सुर्वे यांचे शेवटचे जाहीर काव्यवाचन.

Saturday, 25 February 2012

"Exchange Mela!"

'Ting Tong' घरातल्या शांततेला भेदत,दारावरची बेल चिडली 
दरवाजा  उघडला, plastic smile ने तरुण हसला,
विचारले- काय? ,म्हणाला, complex मध्ये मेला लागलाय.
कसला? 
Washing machine, fridge जुना द्या ,नवा घ्या ,कमी किंमतीत.
हसलो.
नाही म्हटले, दरवाजा लोटला, किचनमध्ये आलो
Fridge, machine दोघांकडे पाहिले,अन डोळे पाणावले  


चाळीतल्या मोरीत, ढोक्याने कपडे  बदडवणारी आई आठवली,
ज्या वर्षी तिला मशीन भेट दिली, त्याच वर्षी cancer ने ती  गेली
गेली वीस वर्षे,जुजबी आजारी पडून 
अविरत घुसळतेय ही आमच्यासाठी
जसा मी घुसळायचो आईच्या कुशीत.


आई कुणी Exchange  करेल का?

गरम डोक्याचे बाबा,आई पाठोपाठ वारले.
पुढल्या वर्षी,  Fridge च्या रुपात थंडपणे परतले,
अविरत,थंडपणे, ताजा ठेवतात आमचा मूड

बाबांना कुणी Exchange करेल का?

ही यंत्र नाहीत, नाती आहेत
 जपावी लागतात, सांभाळावी लागतात,मानवी शरीरासारखी.....
(२५  फेब २०१२ ,वेळ रा. ८.१०)

Sunday, 19 February 2012

सोसायटयांचे वारे

डोन्गराची उतरण, त्यावर विसावलेली हिरवळ
पक्ष्यांचा चिवचिवाट,खळखळणार पाणी 
 कधी,कधी त्यातनं  घोन्घावणारा वारा
अधे, मधे एखाद श्वापद शिकारीसाठी डोकावणारं
वर्षानुवर्षे सूर्य,चंद्राच्या साक्षीने त्यांचेच राज्य  
त्यांचीच हुकुमत, त्यांचेच वर्चस्व  

एकदा 

एक बाबा, भगवी नाटकं पांघरून,तिथल्याच एका दगडावर विसावला 
हळू हळू शेड उभारली,झेंडा लागला,चूल पेटली,चिल्मी फुंकू लागल्या
दिवस सरू लागले,गवत,काटक्या,रोपटी,फांद्या,छटू लागल्या 
हळू हळू  माणसांची वर्दळ वाढू लागली 
झोपड्या वाढल्या,तबेले आले,कच्चे रस्ते आले,गटारे झाली
यथावकाश झोपड्यांचा चाळी झाल्या,रस्ते वाढले चौक आले
नंतर कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले,कडेला दुकानं आली
भाज्यांची,मटणांची,दुधाची,किराण्याची, कपडयांची
मनोरंजनांची,  केशकतॆनालय़ांची, एखाद दुसरी पालॆरचीही
आणि हो ....महत्वाच म्हणजे दारूचीही
वस्त्या वाढल्या,संसार फुगले, लग्न, बारस, पुज्यांचा गोन्धळ वाढला 
खळखळणार्या पाण्याचा गलिच्छ नाला कधी झाला,कळलच नाही

आणि एक दिवस

"झोपू"आली आणि सर्वजण, खडबडून जागे झाले 
सोसायटयांचे वारे वाहू लागले,वस्त्य्यांमध्ये सभा सुरु झाल्या 
सरकारी कार्यालये वळवळू लागली दलालांच्या रोगी शरीराने
ठराव झाले,खिसे भरले,यंत्र चाळी झोडपू लागली
                                                   एखाद दुसरं आजूबाजूने ओरबाडलेल ओकबोकं घर
                                              कसल्यातरी आशेवर उगाचच शिल्लक राहिले वाट बघत 
एके काळी नगरपालिकेच्या,गजबजलेल्या संडासात
वस्त्यातली भटकी,उपाशी,पोरकी कुत्री शांत विसावली   
   सगळीकडे  debrisची स्मशान शांतता पसरली 
                       
                                                                      आता पुन्हा कधीतरी 

गजबजाट सुरु होईल ,उंच इमारतींच्या बांधकामांचा 
धरणीच्या छाताडावर हल्ले होतील अवजड यंत्रांचे
धरणी पोखरून ,उभे राहतील निर्लज्जपणे समोरच्या डोन्गरासमोर 
concrete जंगल 

आणि हो

त्या बाबाची झोपडी मात्र,आणखी पुढे जाईल, डोन्गराचा केक कापायला 
वाहू लागतील  पुन्हा "सोसायटयांचे वारे"
     
     


           ( २५ .०७.२०११   सकाळी ७.४० )

Friday, 17 February 2012

" असच सैरभैर असत "

चाळीशी ओलांडते ,नजरेत धूसरता येते 
हालचाली दिसतात ,पण रोख कळत नाही 
रंग दिसतो, पण वस्तू कळत नाही 
आंबा दिसतो, पण मोहर दिसत नाही
दारू दिसते ,पण ब्रांड कळत नाही 
ताट दिसते, पण पदार्थ समजत नाही
नाती लक्षात येतात,पण चेहरा दिसत नाही
पालेभाज्या दिसतात, पण मेथी सापडत नाही
अंडी दिसतात,पण देश कळत नाही   
भेळ दिसते, पण मिरची gap  काढते 
हॉटेलात चव कळते,पण बिल दिसत नाही
स्पर्श जाणवतो, पण हावभाव कळत नाहीत


लोक धावतात, म्हणून आपण पळतो
चावल्यानंतर, मच्छर कळतो    
प्रवास जाणवतो,पण स्टेशन कळत नाही
खिश्यात थप्पी असते,पण नोटा कळत नाहीत 
कपडे दिसतात, पण 'पैरण' सापडत नाही
मासळी दिसते, पण मासा सापडत नाही
बस दिसते, पण नंबर दिसत नाही
रिक्षा दिसते, पण मीटरचे reading दिसत नाही 
मटण दिसते, पण हड्डी दिसत नाही
भरलेल्या कपाटात, चड्डी सापडत नाही 


एक दिवस डोळ्यांवर चष्मा येतो
तरुण झाल्याचा भास होतो
ट्रेनच्या गर्दीत हुंदडायला लागतो 
दर्व्ज्यातून डोके बाहेर काढायला लागतो
platform वर  उतरताना घाईघाईत 
कुणीतरी मागून ओरडत
"अंकल,जरा जल्दी उतरो यार"
पूल चढताना ,माग्च्याजणी ओरडतात 
"अहो काका जरा बाजूने चाला"


बायकोला ,कविता ऐकवली 
ती म्हणाली,क्रमवारी चुकलीय 
मनात म्हणालो 
वय झाल्यावर, क्रमवारीच काही खर नसत
पुढल जीवन असच
सैरभैर असत ,सैरभैर असत,सैरभैर असत(२८ .०८.२००९ वेळ ,संध्या.४.३०)Tuesday, 14 February 2012

"करदाता"गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत 'तुंम्ही' नेमके कोण आहात?
सारवलेला  make-up, चकचकीत कपडे,सोन्याने अवजड झालेले छाताड पेलवत,
 मिरवत चाललेला मिरवणुकीचा मालक?
 ढोलावर वेताचे फटके बदडवणारा अशांत बेन्जोवाला?
बेन्जोवाल्याच्या गुलामगिरीत विकृत हावभाव करून दात विचकत नाचणारा songadya?
songadyyanna न्याहाळत कूर्मगतीने पुढे सरकणारा आंबट शौकीन?
   कानाचे पडदे फाडणार्या ढोलताश्यांच्या आवाजात, फटाक्यांचे आवाज कोम्बणारा कोम्बर?
रात्रीच्या Qrtr. ची सोय झाली त्या खुशीत टेम्पो चालवणारा चालक?
RTO गिरीची खाज मिटवत उगाचच रस्त्य्यावरील कर्जाऊ गाड्यांना हातवारे करणारा कार्यकर्ता?
कि!
उत्सवाच्या स्वाईनफ्लूमुळे सोन्डेचा मास्क लाऊन टेम्पोत पाठमोरा बसलेला देव?
यातला कुणीच नाही?  तर मग!
अंधाऱ्या खोलीच्या कोनाड्यातून हताशपणे हे सर्व निरीक्षण करणारा एक सर्वसामान्य
"करदाता"(२७ ऑगस्ट २००९ वेळ  संध्या. ४.००)