Sunday, 12 February 2012

मुंबईच पाणी


पहाटे सहा वाजता थयथयाट करत 
सुरु होतो सिंक मधला नळ  
सुस्तावलेली शरीरे 
खरकटलेली भांडी
पारोसे कपडे 
टोप आणि मडके 
सर्वांचीच धावपळ सुरु होते 

दिवसाचे timetable 
अवलंबून असते 
त्या 
फक्त एक तासावर 
BMC च्या पाण्यावर 
पाणी 
नुस्त  पाणी नाही तर 
ते 
मुंबईच पाणी , पहाटेच 
शिस्त लावते 
या शहरात जगण्यासाठी 

(१५ जुलै २००९ पहाटे ६.५५ )

1 comment: