Monday, 13 February 2012

शुन्यासाठी


Bank a/c no, ATM pin no, 
Pan card no, Debit card log in no
Ration card no, Pass port no
Driving licence no,वीजेच meter no
STD lock no, STD open no
Tel.no, mobile no, computer password no
Flat no, pin code no
नंबर्स,नंबर्स आणि नंबर्स 
या सर्व नंबर्सचे ते आकडे 
भरीस भर 
महत्वाच्या तारखांचे , जमा खर्चाचे आकडे 
भंडावून टाकणारे हे आकडे 
एक दिवस मटका खेळतात,तसे सर्व आकडे 
एकात एक मिसळले व शेवटचा आकडा शोधला 
तो निघाला "शुन्य "
या शून्याच्या वर्तुळासाठी हि धावपळ?
गरजा  काय? विसरूनच गेलो 
किंबहुना त्या माहित तरी होत्या का? 
मग एकांतात मुसुमुसु रडतो 
पण कसल काय?
अश्रुंचे गोलाकार थेंब 
आठवण करून देतात पुन्हा 
या शहरात कराव्या लागणाऱ्या धावपळीची 
त्याच शुन्यासाठी

(८ एप्रिल २०१०, वेळ १८:००)

No comments:

Post a Comment