Sunday, 19 February 2012

सोसायटयांचे वारे

डोन्गराची उतरण, त्यावर विसावलेली हिरवळ
पक्ष्यांचा चिवचिवाट,खळखळणार पाणी 
 कधी,कधी त्यातनं  घोन्घावणारा वारा
अधे, मधे एखाद श्वापद शिकारीसाठी डोकावणारं
वर्षानुवर्षे सूर्य,चंद्राच्या साक्षीने त्यांचेच राज्य  
त्यांचीच हुकुमत, त्यांचेच वर्चस्व  

एकदा 

एक बाबा, भगवी नाटकं पांघरून,तिथल्याच एका दगडावर विसावला 
हळू हळू शेड उभारली,झेंडा लागला,चूल पेटली,चिल्मी फुंकू लागल्या
दिवस सरू लागले,गवत,काटक्या,रोपटी,फांद्या,छटू लागल्या 
हळू हळू  माणसांची वर्दळ वाढू लागली 
झोपड्या वाढल्या,तबेले आले,कच्चे रस्ते आले,गटारे झाली
यथावकाश झोपड्यांचा चाळी झाल्या,रस्ते वाढले चौक आले
नंतर कच्च्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले,कडेला दुकानं आली
भाज्यांची,मटणांची,दुधाची,किराण्याची, कपडयांची
मनोरंजनांची,  केशकतॆनालय़ांची, एखाद दुसरी पालॆरचीही
आणि हो ....महत्वाच म्हणजे दारूचीही
वस्त्या वाढल्या,संसार फुगले, लग्न, बारस, पुज्यांचा गोन्धळ वाढला 
खळखळणार्या पाण्याचा गलिच्छ नाला कधी झाला,कळलच नाही

आणि एक दिवस

"झोपू"आली आणि सर्वजण, खडबडून जागे झाले 
सोसायटयांचे वारे वाहू लागले,वस्त्य्यांमध्ये सभा सुरु झाल्या 
सरकारी कार्यालये वळवळू लागली दलालांच्या रोगी शरीराने
ठराव झाले,खिसे भरले,यंत्र चाळी झोडपू लागली
                                                   एखाद दुसरं आजूबाजूने ओरबाडलेल ओकबोकं घर
                                              कसल्यातरी आशेवर उगाचच शिल्लक राहिले वाट बघत 
एके काळी नगरपालिकेच्या,गजबजलेल्या संडासात
वस्त्यातली भटकी,उपाशी,पोरकी कुत्री शांत विसावली   
   सगळीकडे  debrisची स्मशान शांतता पसरली 
                       
                                                                      आता पुन्हा कधीतरी 

गजबजाट सुरु होईल ,उंच इमारतींच्या बांधकामांचा 
धरणीच्या छाताडावर हल्ले होतील अवजड यंत्रांचे
धरणी पोखरून ,उभे राहतील निर्लज्जपणे समोरच्या डोन्गरासमोर 
concrete जंगल 

आणि हो

त्या बाबाची झोपडी मात्र,आणखी पुढे जाईल, डोन्गराचा केक कापायला 
वाहू लागतील  पुन्हा "सोसायटयांचे वारे"
     
     


           ( २५ .०७.२०११   सकाळी ७.४० )

No comments:

Post a Comment