Saturday, 25 February 2012

"Exchange Mela!"

'Ting Tong' घरातल्या शांततेला भेदत,दारावरची बेल चिडली 
दरवाजा  उघडला, plastic smile ने तरुण हसला,
विचारले- काय? ,म्हणाला, complex मध्ये मेला लागलाय.
कसला? 
Washing machine, fridge जुना द्या ,नवा घ्या ,कमी किंमतीत.
हसलो.
नाही म्हटले, दरवाजा लोटला, किचनमध्ये आलो
Fridge, machine दोघांकडे पाहिले,अन डोळे पाणावले  


चाळीतल्या मोरीत, ढोक्याने कपडे  बदडवणारी आई आठवली,
ज्या वर्षी तिला मशीन भेट दिली, त्याच वर्षी cancer ने ती  गेली
गेली वीस वर्षे,जुजबी आजारी पडून 
अविरत घुसळतेय ही आमच्यासाठी
जसा मी घुसळायचो आईच्या कुशीत.


आई कुणी Exchange  करेल का?

गरम डोक्याचे बाबा,आई पाठोपाठ वारले.
पुढल्या वर्षी,  Fridge च्या रुपात थंडपणे परतले,
अविरत,थंडपणे, ताजा ठेवतात आमचा मूड

बाबांना कुणी Exchange करेल का?

ही यंत्र नाहीत, नाती आहेत
 जपावी लागतात, सांभाळावी लागतात,मानवी शरीरासारखी.....
(२५  फेब २०१२ ,वेळ रा. ८.१०)

No comments:

Post a Comment